Maharashtra flood alert |
पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राने जूनच्या मध्यावरच संपूर्ण महिन्याची सरासरी गाठण्याचा विक्रम यंदा केला आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या दोन्ही भागांत पूरस्थितीची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. कोकणात २३ जूनपर्यंत अतिवृष्टी सुरू राहणार आहे, तर मध्य महाराष्ट्र अन् विदर्भात मुसळधारेचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, मंगळवारी मान्सूनने गुजरात, मध्य प्रदेश, बिहार ही राज्य काबीज केल्याने आता देशाच्या ६५ टक्के भागांत मान्सून पोहचला आहे.