Press "Enter" to skip to content

mumbai local train accident thane mayur shah lost his life in mumbra local clash marathi news 

ठाणे : मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये 13 प्रवासी रेल्वेतून खाली पडले अन् त्यापैकी चार जणांना आपला जीव गमवावा लागला. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते. त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. यावेळी 13 प्रवासी खाली पडले आणि 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये ठाण्यातील एका 44 वर्षीय आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाला. मयूर शाह असं त्याचं नाव आहे. डोंबिवलीत स्वप्नातील घर घेण्यासाठी निघालेल्या मयूरचा हात घसरला आणि दुर्दैवी मृत्यू झाला. 

मयूर शाह हा ठाण्याच्या घोडबंदर परिसरात त्याच्या आईसोबत राहायचा. त्याला दोन बहिणी असून दोघींचीही लग्ने झाली आहेत. मयूर शाह हा स्वतः अविवाहित होता. तो विद्याविहार या ठिकाणी नोकरी करायचा. त्याची डोंबिवलीत फ्लॅट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होती. ज्याच्याकडून हा फ्लॅट खरेदी करायची होती तो मालक डोंबिवलीमध्ये राहत होता. त्यामुळे मयूर हा त्याला भेटण्यासाठीच डोंबिवलीला गेला असेल असा अंदाज त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.

या प्रकरणी मयूर शाहच्या मेहूण्यांनी, संतोष दोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, “मयूर हा ठाण्यामध्ये त्याच्या आईसोबत राहायचा. त्याचे वडील हे 22 वर्षांपूर्वीच वारले. तो विद्याविहारला कामाला होता. त्याला डोंबिवलीत घर घ्यायचं असल्याने तो कधीकधी घराच्या मालकाला डोंबिवलीत भेटायला जायचा. आताही सकाळी तो त्यासाठीच गेला असेल आणि त्या दरम्यान हा अपघात झाला. पोलिसांनी आम्हाला या दुर्घटनेची माहिती दिली.”

Mumbai Local Train Accident : स्टेशनरीमध्ये काम करणाऱ्या राहुल शाहांचा मृत्यू

मुंब्रा इथं घडलेल्या अपघातात 44 वर्षांचे राहुल शाह यांचा मृत्यू झाला. शाह मुंबईतील एका स्टेशनरी दुकानात काम करायचे. आई-वडील, दोन लहान बहिणी आणि एक लहान भाऊ असा त्यांचा परिवार आहे. घरात कमावणारे ते मुख्य सदस्य होते. 

Mumbra Local Train Accident : आरपीएफ जवानाचा मृत्यू 

रेल्वे अपघातात जीआरपीएफ जवान विकी मुख्यदल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. विकी नाईट शिफ्ट संपवून ठाण्याहून सकाळच्या ट्रेनने कल्याणच्या दिशेने निघाला होता. जेव्हा ट्रेन क्रॉस होत होत्या त्यावेळी तोही ट्रेनमधून खाली कोसळला. त्यावेळी त्याच्यासोबत बायको आणि मुलगी होती. 

लोकल अपघात- मृतांची नावे

  • राहुल संतोष गुप्ता (28 ) रा. दिवा, 
  • सरोज केतन (23 ) रा. उल्हासनगर 
  • मयूर शाह (50 )
  • मच्छीद्र मधुकर गोतरणे, वय-31 (पोलीस कॉन्स्टेबल)

मुंब्र्याजवळचे वळण धोकादायक

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातासाठी अनेक प्रवाशांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्थानकाजवळच्या तीव्र वळणाला जबाबदार ठरवलं. या वळणावर अप आणि डाऊन दिशेनं जाणाऱ्या लोकल किंवा इतर ट्रेनमधलं अंतर कमी होतं. या वळणासंदर्भात रेल्वे प्रशासनानं तातडीनं तोडगा काढावा अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. 

आता याच ठिकाणी चार प्रवाशांना नाहक आपला जीव गमवावा लागला. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे आता तरी रेल्वे प्रशासन मुंब्रा स्थानकाजवळच्या धोकादायक वळणाची दखल घेत त्यावर काही तोडगा काढणार का हे पाहावं लागेल.

 

ही बातमी वाचा : 

आणखी वाचा

Source link